महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जादूचं अनोखं जग दाखवणार धनुष; 'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर'चा ट्रेलर प्रदर्शित - magic world

हा चित्रपट भारतासह अमेरिका, कॅनडा, लंडन, सिंगापूर, मलेशिया, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. फ्रेन्च-इंग्रजी, अशी या चित्रपटाची भाषा आहे. तमिळ, तेलुगू भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

जादूचं अनोखं जग दाखवणार धनुष; 'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jun 4, 2019, 3:40 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने आजवर वेगवेगळे प्रयोग असलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांचे प्रेमही मिळाले आहे. आता धनुषची अशाचप्रकारची वेगळी भूमिका त्याच्या आगामी 'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर' या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामध्ये तो जादुगाराच्या रुपात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर' हा धनुषचा पहिला वहिला आतंरराष्ट्रीय चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आतंरराष्ट्रीय कलाकार झळकणार आहे. हा चित्रपट एका जादुगारावर आधारित आहे. त्याच्या जादुच्या विविध प्रयोगासाठी तो कशाप्रकारे देशविदेशात प्रवास करतो याचा रंजक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

जादूचं अनोखं जग दाखवणार धनुष; 'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर'चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट भारतासह अमेरिका, कॅनडा, लंडन, सिंगापूर, मलेशिया, बांग्लादेश आणि नेपाळ या देशांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. फ्रेन्च-इंग्रजी, अशी या चित्रपटाची भाषा आहे. तमिळ, तेलुगू भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन हॉलिवूड दिग्दर्शक केन स्कॉट यांनी केले आहे. हा चित्रपट 'द एक्स्ट्राऑर्डिनरी फकिर' या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात मुंबईच्या रस्त्यावर जादुचे प्रयोग दाखवणारा 'अजा' (धनुष) आईच्या मृत्यूनंतर वडिलांना शोधण्यासाठी पॅरिसला पोहोचतो. तिथे त्याच्या आयुष्यात कशाप्रकारे चढउतार येतात याची गोष्ट या चित्रपटात दाखवली जाणार आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details