महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गेल्या पाच महिन्यात चौथ्यांदा क्वारंटाईन झाली देवोलिना - चौथ्यांदा क्वारंटाईन झाली देवोलिना

देवोलिना भट्टाचार्जी हिचा कुक कोरोना व्हायरसमुळे आयसोलेशन सेंटरमध्ये गेल्यामुळे तिने स्वतःला क्वारंटाईन केले आहे. तथापि तिच्या कुकचा तपासणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

Devoleena
देवोलिना भट्टाचार्जी

By

Published : May 8, 2020, 6:41 PM IST

मुंबई - टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिच्या स्वैपाक करणाऱ्या कुकला कोरोना बाधा झाल्याच्या संशयावरुन आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर तिने स्वतः ला क्वारंटाईन करून घेतले आहे.

देवोलिना भट्टाचार्जी हिचा कुक ज्या सहकाऱ्यासोबत काम करीत होता त्याचा कोरोना अहवाल आल्यानंतर कुकलाही आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले. मात्र त्याच्या तपासणीनंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केलंय. असे असले तरी देवोलिना भट्टाचार्जी हिने स्वतः ला क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय.

आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना देवोलिना म्हणाली, ''मी जाणीवपूर्वक स्वतः ला क्वारंटाईन केले आहे. हे सोपे नाही. गेल्या ५ महिनन्यात मी चौथ्यांदा चार भिंतीच्या आत कोंडून घेतलंय. पहिल्यांदा 'बिग बॉस १३' मध्ये, त्यानंतर माझ्या पाठीच्या दुखण्याने मला बेड रेस्ट सांगण्यात आली होती. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले आणि आता मी स्वतः ला लॉकअप करून घेतलंय.''

'साथ निभाना साथिया' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील ही अभिनेत्री स्वतः चांगली कुक आहे. त्यापातळीवर तिला चिंतेचे कारण नाही. 'बिग बॉस १३' मध्ये ती उत्तम स्वैपाक बनवताना सर्वांनी पाहिले आहे.

देवोलिना अलिकडेच ट्रोल झाल्यामुळे चर्चेत आली होती. तिची सहकारी शहनाझ गिलच्या फॅन्सनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवत ट्रोल केले होते. सिध्दार्थ शुक्ला आणि शहनाझ यांच्या 'भुला दुंगा' या म्यूझिक व्हिडिओमध्ये दोघांमध्ये केमेस्ट्री आढळून आली नव्हती अशी कॉमेंट देवोलिनाने केली होती. त्यानंतर टीकेचा सामना तिला करावा लागला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details