महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

२ तासांच्या महाएपिसोडने ‘देवमाणूस २’ चा होणार आरंभ! - झी मराठीवरील देवमाणूस मालिका

झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं होतं. आता या मालिकेचा दुसरा भाग येणार आहे. येत्या १९ डिसेंबर ला रात्री ९ वा. दोन तासांच्या महाएपिसोडने ‘देवमाणूस २’ चा आरंभ होणार आहे.

देवमाणूस २ चा होणार आरंभ
देवमाणूस २ चा होणार आरंभ

By

Published : Dec 16, 2021, 7:21 PM IST

वज्र प्रोडक्शन्स निर्मित 'देवमाणूस' या झी मराठी वरील एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेने आपल्या लोकप्रियतेने छोट्या पडद्यावरील टिआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले. त्यामुळेच आता 'देवमाणूस’ पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, दुसरा भाग घेऊन. झी मराठीवरील 'देवमाणूस' या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं.

या मालिकेतील रंजक वळणं पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि 'देवमाणूस'मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.

मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे कारण 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लवकरच 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी 'देवमाणूस २' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

येत्या १९ डिसेंबर ला रात्री ९ वा. दोन तासांच्या महाएपिसोडने ‘देवमाणूस २’ चा आरंभ होणार आहे. यानंतर ही मालिका सोमवार २० डिसेंबर पासून दर सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. प्रसारित होणार आहे.

हेही वाचा -Ankita Lokande Wedding Gift : अभिनेत्री अंकिता लोखंडेला विकीने दिली कोट्यवधीची भेट

ABOUT THE AUTHOR

...view details