महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'केबीसी'मध्ये रंगीत साडीत खुलले दीपिकाचे सौंदर्य - बनेगा करोडपती कार्यक्रमात दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणने रविवारी कोण बनेगा करोडपती कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तिने नेसलेल्या साडीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या शोमध्ये दिसण्यासाठी दीपिकाने कौटूरियर पायल खंडेलवालची प्लेटेड साडी निवडली होती.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण

By

Published : Sep 6, 2021, 5:15 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone)अलिकडेच 'कौन बनेगा करोडपती'च्या (Kaun Banega Crorepati) शुटिंगमध्ये भाग घेतला. यावेळी तिने परिधान केलेल्या साडीची सध्या जोरदार चर्चा आहे. या साडीत ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना आनंद देत आहेत. रविवारी दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर 'केबीसी'मधील फोटो पोस्ट केले. तिने परधान केलेल्या या साडीची किंमत 19 हजारहून अधिक असल्याचे सांगण्यात येते.

'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये दिसण्यासाठी दीपिकाने कौटूरियर पायल खंडेलवालची प्लेटेड साडी निवडली. फिकट गुलाबी रंगाच्या साडीमध्ये उजळ रंगांच्या डॅशसह अभिनेत्री दीपिका सौंदर्यवान दिसत आहे. दीपिका पदुकोणने तिचा मेकअप कमीत कमी ठेवला असून केसांचा अंबाडा घातल्याचे दिसत आहे व तिने एक्वा ब्लू इअररिंग्स घातल्या आहेत.

'कौन बनेगा करोडपती'च्या शानदार शुक्रवार या कार्यक्रमात दीपिका पदुकोण आणि फराह खान खास पाहुणे (special guests ) म्हणून येणार आहेत. अमिताभ (Amitabh Bachchan ) होस्ट करीत असलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवारी खास पाहुणे पाहायला मिळतील. येत्या शुक्रवारी आपल्याला दीपिका पदुकोण आणि फराह खान यांचे दर्शन घडेल.

चित्रपट आघाडीवर, दीपिकाच्या ''का प्रॉडक्शन हाऊस'' या बॅनर तर्फे 2020 मध्ये छपाक' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आगामी कबीर खान दिग्दर्शित 83 आणि हॉलीवूड चित्रपट 'द इंटर्न'चे आगामी हिंदी रूपांतरण यासारख्या चित्रपटांनादेखील तिच्या का प्रॉडक्शन हाऊसचे सहकार्य असेल. दीपिका पादुकोण धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या व शकुन बत्रा दिग्दर्शित चित्रपटात (अद्याप शीर्षक ठरलेले नाही) आणि शाहरुख खानची भूमिका असलेल्या सिद्धार्थ आनंदच्या पठाण या अॅक्शनपटात झळकणार आहे.

हेही वाचा - ‘शर्माजी नमकीन' : परेश रावल यांनी पूर्ण केला ऋषी कपूर यांचा 'अखेर'चा चित्रपट!!

ABOUT THE AUTHOR

...view details