मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक फोटो सोशल मीडियामध्ये सध्या खूप चर्चेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. बिकनीमध्ये पोज देत असतानाचा हा फोटो सध्या व्हायरल झालाय.
अलिकडेच दीपिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ती जीममध्ये आपल्या ट्रेनरसोबत गंभीरपणे व्यायम करीत असताना दिसली होती. मात्र मागे चेन्नई एक्सप्रेसमधील शाहरुख आणि दीपिकाच्या लुंगी डान्स गाण्याचा आवाज सुरू होतो आणि व्यायामाच्या मध्येच दीपिता ताल धरताना दिसते. या व्हिडिओचीही सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली होती.
कामाच्या पातळीवर विचार करता अभिनेत्री दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला. लक्ष्मी अग्रवाल यांच्या सत्यकथेवर आधारित हा चित्रपट होता. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलेची, ही प्रेरणादायी कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. 'छपाक'ने ३२.४८ कोटीचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला.
दीपिका आगामी '८३' या चित्रपट झळकणार आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वकरंडकाची ही रोमहर्षक कथा आहे. यात रणवीरसिंग कपील देव यांची भूमिका साकारत असून कपील देव यांच्या पत्नीची भूमिका दीपिका करीत आहे.