मुंबई -सध्या देशभरात कोरोनामुळे घराबाहेर पडणं अशक्य झालेलं आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी देखील घरात बसून आहेत. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या या वेळेचा अभिनेत्री पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत.
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपल्या स्वयंपाकघरात रमली आहे. सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे तिने कोणत्या डब्ब्यात काय सामान भरून ठेवले त्याच्या चिठ्ठ्या करून लावल्या आहेत.