मुंबई - अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित 'छपाक' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. या पहिल्या लूकमध्ये दीपिकाचा एक फोटो सर्वांना थक्क करून सोडणारा आहे.
लक्ष्मी अग्रवाल यांच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या चेहऱ्यावर हुबेहुब बारकावे साकारण्यात आले आहेत. 'छपाक'च्या फर्स्ट लूकमध्ये ती हुबेहुब लक्ष्मी अग्रवाल यांच्यासारखी दिसत आहे. या चित्रपटात तिचे नाव 'मालती' असल्याचे या फोटोवरून समजते. तिच्या या लूकची बॉलिवूड कलाकारांनीही प्रशंसा केली आहे.
एका अॅसिड हल्यातील पीडित मुलीची भूमिका साकारणे आव्हानात्मक असल्याचे या कलाकारांनी म्हटले आहे. परिनीती चोप्रा, विकी कौशल, आलिया भट्ट यांनी दीपिकाच्या या लूकचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'राजी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलिकडेच या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आता सर्वांचे लक्ष त्यांच्या 'छपाक' चित्रपटाकडे लागले आहे. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.