मुंबई - मराठी सिनेसृष्टीत नेहमीच दोन नावं काहीतरी नवीन करण्याच्या ध्यासाने एकत्र येऊन सर्वांचे लक्ष वेधत असतात. नामवंत दिग्दर्शक आणि समीर आशा पाटील आणि निर्माते अजय ठाकूर हे आपल्या आगामी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. 'डार्लिंग' असे त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी आतापर्यंत नेहमीच प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिले आहेत. तर अजय ठाकूर यांनीही दर्जेदार मनोरंजक सिनेमांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे ‘डार्लिंग’च्या निमित्ताने दिग्दर्शक आणि निर्मिती पातळीवरील दोन मातब्बर व्यक्तिमत्त्वं एकत्र आल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
समीर आशा पाटील यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघेऱ्या’ या सिनेमांनी प्रेक्षकांना वास्तववादी चित्र दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अजय ठाकूर यांनी ‘तानी’, ‘फुंतरू’ आणि ‘टकाटक’ या सिनेमांच्या माध्यमातून वस्तुस्थिती निदर्शनास आणतानाच प्रेक्षकांना कल्पना विश्वातही रमण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आता ‘डार्लिंग’मध्ये हे दोघे काय कमाल करतात ते पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा -संभाजी महाराजांनी काय सोसलंय हे आत्ताच्या पिढीला कळायला हवे..