महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कलर्स 'डान्स दीवाने' मध्ये गायक दलेर मेहंदी आणि बी प्राक - daler mehandi

कलर्स 'डान्स दीवाने' या रिअॅलीटी शोमध्ये यंदा पंजाबी पॉपचा राजा दलेर मेहंदी, मिका सिंग आणि बी प्राक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या बचपन का प्यार संपूर्ण सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याने, शोमध्येही बचपन स्पेशल एपिसोड आयोजित करण्यात आला होता. बालपण साजरे करण्यासाठी, बचपनच्या विशेष भागामध्ये भांगडा किंग दलेर मेहंदी त्याचा लाईव्हवायर भाऊ मिका सिंग आणि लोकप्रिय पंजाबी गायक हे गायक हजेरी लावतील.

डान्स दीवाने'
डान्स दीवाने'

By

Published : Aug 12, 2021, 10:27 AM IST

मुंबई - कलर्स 'डान्स दीवाने' या रिअॅलीटी शोमध्ये यंदा पंजाबी पॉपचा राजा दलेर मेहंदी, मिका सिंग आणि बी प्राक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या बचपन का प्यार संपूर्ण सोशल मीडियावर ट्रेंड करत असल्याने, शोमध्येही बचपन स्पेशल एपिसोड आयोजित करण्यात आला होता. बालपण साजरे करण्यासाठी, बचपनच्या विशेष भागामध्ये भांगडा किंग दलेर मेहंदी त्याचा लाईव्हवायर भाऊ मिका सिंग आणि लोकप्रिय पंजाबी गायक हे गायक हजेरी लावतील.

डान्स दीवाने'

सर्वात आवडते स्पर्धक सोमांश डांगवाल आणि आकाश थापा यांनी छोटा दलेर आणि मिका यांची भूमिका साकारली. त्यामुळे दोघेही आश्चर्यचकित झाले. ही कामगिरी पाहून दलेर मेहंदी यांनी कथा सांगितnr. “मिका हा वडिलांचा आव़ता मुलगा होता. काही काम करायचे असल्यास आम्ही मिकालाच सांगत असे. आम्ही अमितजींचे मोठे चाहते होतो. आणि त्यांचा प्रत्येक चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहत असे. तेव्हा वडिलांनी मला 70 रुपयाची सायकल घेतली होती. मिकाच फक्त सायकल चालवत असे. आणि ती सायकल मी चालवली होती.

पापाय आणि अंतरा यांनी सादर केलेल्या मिट्टी या गाण्यावर मिका आणि बी प्राक कडून चांगल्या कमेंट्स मिळाल्या. हे गाणे मला आवडते. मला बी प्राककडून हे गाणे ऐकायचे आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्याने गाणे गायले.

हेही वाचा -मोनालिसा बागल ‘नुसती ‘Shining' सह जपते सामाजिक बांधिलकी

ABOUT THE AUTHOR

...view details