मुंबई- टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलाइक या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधित झाली होती. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कुटुंबीय आणि चाहत्यांनी तिच्यावर व्यक्त केलेल्या प्रेमामुळे ती भावूक झाल्याचे व्हिडिओत दिसते.
१ मे रोजी रुबिनाने आपली कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे चाहत्यांना इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून कळवले होते. हिमाचल प्रदेश येथील आपल्या गावी शिमला येथे कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या रुबिनाने कोरोना व्हायरसशी मुकाबला केला.