महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मुक्ता आणि उमेश म्हणतात... 'बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं' - नविन मराठी मालिका

प्रेमाला कुठे असते ‘एक्सपायरी डेट’ (Expiry Date) असे म्हणणार्‍या मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी अशी त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत.

मुक्ता
मुक्ता

By

Published : Jul 11, 2021, 9:23 PM IST

मुंबई -बऱ्याच कालावधीनंतर मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले आहेत. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं त्यानंतर तब्बल ८ वर्षांनी ते दोघे एकत्र काम करणार आहेत. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीरा आणि आदिराज यांची भेट बऱ्याच वर्षांनंतर होते आणि त्यांना उमगते की ‘बेस्ट पेक्षा बेटर काहीच नसतं’. त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रेक्षकांसाठी मेजवाणी

सध्याच्या तणावपूर्ण वातावरणात सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांसाठी ही खुसखुशीत मालिका आणली आहे. प्रेमाला कुठे असते ‘एक्सपायरी डेट’ (Expiry Date) असे म्हणणार्‍या मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ही एक परिपूर्ण प्रेमकहाणी असणार आहे. मीरा आणि आदी अशी त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. मालिकेच्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

अजूनही बरसात आहे

'हे' कलाकार आहेत भूमिकेत

रोहिणी निनावे आणि मुग्धा गोडबोले यांनी मालिकेची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर केदार वैद्य मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. या मालिकेच्या शीर्षकगीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी मालिकेचे शीर्षकगीत संगीतबद्ध केले आहे. मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळीही असणार आहेत.

'या' वेळेला होणार प्रसारित

सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत चित्रपटसृष्टीतले लाडके चेहरे, मुक्ता बर्वे आणि उमेश कामत मुख्य भूमिकांत दिसणार आहेत आणि प्रेक्षकांवर मनोरंजनाची ‘बरसात’ होणार आहे. 'अजूनही बरसात आहे' ही मालिका येत्या १२ जुलैपासून सोमवार-शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details