"कॉमेडी कॉकटेल" या वेबसिरीजची निर्मिती संकल्पना श्रीनिवास कुलकर्णी यांची असून, लेखन/ दिग्दर्शन/ सादरीकरण सुप्रसिद्ध कलाकार आणि मिमिक्री आर्टिस्ट श्री योगेश सुपेकर यांचे आहे.
विनोदी वेबसीरीज 'कॉमेडी कॉकटेल' रसिकांच्या भेटीला . . - 'कॉमेडी कॉकटेल' रसिकांच्या भेटीला
सध्या वेबसिरीजचा ट्रेण्ड असून अनेक नवनवीन वेबसीरीज रसिकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच सिनेशाईनचे अमोल घोडके यांची निर्मित असणारी "कॉमेडी कॉकटेल" जो बघेल तो हसेल ही वेबसिरीज लवकरच भेटीला येत आहे.
रोजच्या आयुष्यातील ताण तणाव यांपासून काही काळ दूर जाऊन रसिकांचे निखळ मनोरंजन व्हावे हा यामागचा उद्देश असून, वेबसिरीज या माध्यमामुळे आपल्याला हवं तेव्हा पाहता येण्याची सुविधा रसिकांना उपलब्ध झाली असल्याचे योगेश सुपेकर यांनी सांगितले. तर यापुढेही वेबसिरीज, गाणी आणि चित्रपट निर्मितीचे ध्येय असून प्रस्थापित कलाकारांच्या सोबत नवीन कलाकारांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे ध्येय सिनेशाईन प्रोडक्शनचे अमोल घोडके यांनी सांगितले.
कॉमेडी कॉकटेल या वेबसिरीजच्या माध्यमातून अनेक कलाकार, राजकारणी, गायक यांचे आवाज, मिमिक्री, धमाल किस्से योगेश सुपेकर रसिकांसमोर सादर करणार आहेत, त्यामुळे रसिकांना ही वेब सिरीज नक्कीच आवडेल असा विश्वास निर्मात्यांना वाटतो, या वेब सिरीजचे छायांकन तसेच संकलन चार्ली स्टुडिओचे विशाल पांढरे यांनी केले असून पब्लिसिटी डिझाईन अनिल शिंदे यांचे आहे.