मुंबई - कोरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देशभर लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे सर्वजणांना घरी राहणे बंधनकारक ठरले आहे. मोदी यांनी स्पष्ट म्हटले होते, 'याला कर्फ्यूसारखेच समजा.' अशात पोलीस सतर्क झाले आहेत. बाहेर पडलेल्या लोकांची पोलीस धुलाई करीत आहेत.
या दरम्यान सोशल मीडियावर लॉकडाऊनचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरचा एक मीम भरपूर चर्चेत आला आहे. हा मीम सुनिल ग्रोव्हरने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ''देवासाठी घरीच थांबा.''
मीममध्ये सुनिल ग्रोव्हरने प्रयत्न केलाय, की कशा प्रकारे घरातून बाहेर पडल्यानंतर पोलीस पकडून धुलाई करीत आहे. सुनिलने आपल्या दोन सिनेमांचे सीन्स एकत्र करुन हे मीम बनवले आहे.