मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. डॉ. श्रीराम लागूजी यांनी साकार केलेला 'नटसम्राट' अविस्मरणीय असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले. पण 'पिंजरा' मधील 'मास्तर' आणि 'सिंहासन' मधील 'मंत्री' त्यांनी जबरदस्त पद्धतीने उभा केला.
"झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!", मुख्यमंत्र्यांनी वाहिली डॉ. लागूंना श्रध्दांजली
"मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. "झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!" असे ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
डॉ. श्रीराम लागू हे उत्तम वाचक, लेखक व विचारवंत होते. सामाजिक, राजकीय विषयांवर ते आपली मते ठामपणे मांडत राहिले. मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात त्यांचे योगदान मोठे होते.
डॉ. लागू यांना महाराष्ट्राची जनता सदैव स्मरणात ठेवील.