महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अंगाला कपडा आणि पोटाला अन्नाचा तुकडा, तमाशा कलावंतांची रसिकांकडे मागणी - The artist must survive

करोना सावटामुळे अडचणीत सापडलेल्या तमाशा कलावंतांना धुळ्याचे नगरसेवक संजय पाटील व शितलभाऊ नवले यांनी मदतीचा हात दिला आहे. भिमा नामा तमाशा मंडळाच्या कलावंतांना दोन महिने पुरेल इतके धान्य व किराणा माल देण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून तमाशा बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Tamasha artist in Dhule
तमाशा कलावंतांची रसिकांकडे मागणी

By

Published : May 6, 2021, 5:52 PM IST

धुळे- करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागलेली टाळेबंदी आणि त्यानंतरच्या काळातही करोना सावटामुळे अडचणीत सापडलेल्या तमाशा कलावंतांना धुळ्याचे नगरसेवक संजय पाटील व शितलभाऊ नवले यांनी मदतीचा हात दिला आहे. भिमा नामा तमाशा मंडळाच्या कलावंतांना दोन महिने पुरेल इतके धान्य व किराणा माल देण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून तमाशा बंद असल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावल तालुक्यातील अंजाडे येथे असलेल्या भिमा नामा तमाशा मंडळाचे नामाभाऊ अंजाळेकर यांच्याकडेही ५० कलावंतांचा संच असून त्यातील १५ कलावंत त्यांच्याच आश्रयाला आहेत. तमाशा बंद असल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आल्याने ज्या-ज्या गावात भिमा नामा तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला. त्या गावात जावून दानशूरांना मदतीचे आवाहन नामाभाऊंनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे मनपातील भाजपा नगरसेवक संजय पाटील व शितलभाऊ नवले यांनी आज अनिल नामा बोरसे - अंजाळेकर यांना तमाशा कलावंतांसाठी दोन महिने पुरेल इतके धान्य व किराणा माल दिला.

तमाशा कलावंत जगवण्यासाठी दिला मदतीचा हात

कलावंत जिवंत राहिला पाहिजे

कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत अनेक कलावंतासह कला दाबल्या जात असताना दिसत आहे. त्यात तमाशा हा अतिशय कठीण काळातून प्रवास करत असतांना कोरोनाच्या संकट प्रसंगी गेल्या वर्षभरापासून सर्वत्र यात्रा उत्सवासारखे कार्यक्रम बंद करण्यात आले आहेl. त्यामुळे तमाशा हा संपुष्टात येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेऊन नगरसेवक संजय पाटील, शीतल नवले यांनी तमाशा कलावंताची मदत केली आहे.

अंगाला कपडा आणि पोटाला अन्नाचा तुकडा

तमाशा कलावंत सांगतात की, या भयंकर परिस्थितीत जगण्यासाठी फक्त अंगाला कापडा आणि पोटाला अन्नाचा तुकडा हवा आहे बाकी आम्हा कलावंतांना काहीच नको.

हेही वाचा - लोक कलावंत करणार लाक्षणिक उपोषण; सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details