हैदराबाद- वेस्ट इंडिजचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या फेरीसाठी ख्रिस गेल सध्या यूएईमध्ये पंजाब किंग्ज संघासोबत आहे.
युवराज सिंग आणि गेल यांची खूप चांगली मैत्री आहे. युवीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गेल जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये युवीने आपला जलवाही दाखवलाय.
व्हिडिओ शेअर करताना युवराजने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एमजे मूव्हसह अनेक आश्चर्यकारक रात्रींवर लक्ष द्या. तुम्हाला खात्री आहे की विराट कोहली माझ्यापेक्षा चांगला डान्सर आहे? '