नवी दिल्ली - सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचं 'हाफ गर्लफ्रेंड' हे पुस्तक अश्लील असल्याचे रेल्वे प्रवासी सुविधा कमीटीचे चेअरमन रमेश चंद्र रत्न यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे पुस्तक रेल्वे स्टेशनवरून हटवण्याचे त्यांनी आदेश दिले आहे. हे पुस्तक वाचण्यासारखं नाही. तसेच, पुस्तकाच्या शीर्षकावरही प्रश्नचिन्ह उमटवत अशाप्रकारची पुस्तकं स्टेशनवर विकली जाऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
रमेश चंद्र रत्न हे कमिटीच्या इतर सदस्यांसोबत नवी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते. प्लॅटफॉर्म नंबर १६ वर असलेल्या बुक स्टॉलवर जेव्हा त्यांनी 'हाफ गर्लफ्रेंड' हे पुस्तक पाहिले तेव्हा त्यांनी हे पुस्तक विक्री न करण्याचे आदेश दिले.