चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या चित्रपटात जरी दिसत नसल्या, तरीही त्या सोशल मीडियावर भलत्याच सक्रिय असतात. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुखचाही समावेश आहे.
जिनेलिया अभिनयापासून दूर असली, तरीही ती सोशल मीडियावर अभिनयाचे लहान- लहान व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळते. विशेष म्हणजे तिच्यासोबत या व्हिडिओंमध्ये तिचा पती रितेशही तिला साथ देताना दिसतो. अशातच जिनेलियाने पुन्हा एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र, या व्हिडिओत रितेश नाही, तर ती आपल्या मुलासोबत दिसत आहे.