सध्या देशातील निरनिराळ्या प्रादेशिक चित्रपटसृष्टीत सौहार्द बघायला मिळतेय. अनेक मराठी कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांतून कामं करताना दिसत असतानाच आता साऊथ इंडियन ॲक्टर्स मराठी चित्रपटातून दिसणार आहेत. निर्माते दिपक राणे यांच्या पॅन इंडिया सिनेमात साऊथचे प्रसिद्ध कलाकार दिसणार दिसणार असून त्याबद्दल आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.
दिपक राणे यांनी आजवर ‘मी नाही हो त्यातला’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘खारी बिस्कीट’ अश्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली. तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दुहेरी’, ‘फ्रेशर्स’, ‘अंजली’, ‘दुनियादारी फिल्मी स्टाईल’ अश्या प्रसिद्ध मालिकांच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली आहे.
मराठी सिनेमात अनेक प्रयोगशील गोष्टी घडताना दिसत आहेत. असाच एक आगळा वेगळा प्रयोग निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी सिनेमात करणार आहेत. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठीतील उत्कृष्ट कलाकार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचा संगम प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शिवाय हा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित होईल. सध्या सिनेसृष्टीत या आगामी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.