महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रामायण मालिकेत निषाद राजची भूमिका साकारणारे चंद्रकांत पंड्या यांचे निधन - रामानंद सागर दिग्दर्शित रामायण

रामायणात (Ramayan) निषाद राजची भूमिका साकारणारे अभिनेता चंद्रकांत पंड्या (Chandrakant Pandya) यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. चंद्रकांत पंड्याच्या मृत्यूची माहिती 'रामायण' मध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी दिली.

चंद्रकांत पंड्या यांचे निधन
चंद्रकांत पंड्या यांचे निधन

By

Published : Oct 21, 2021, 10:39 PM IST

नवी दिल्ली- रामानंद सागर दिग्दर्शित रामायणात (Ramayan) निषाद राजची भूमिका साकारणारे अभिनेता चंद्रकांत पंड्या (Chandrakant Pandya) यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.

त्यांचा जन्म 1 जानेवारी 1946 रोजी गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील भिल्डी गावात झाला होता. 'रामायण' या मालिकेत त्यांनी भगवान रामाच्या मित्राची भूमिका केली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे

काही दिवसांपूर्वी 'रामायण'चे रावण अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले होते. चंद्रकांत पंड्याच्या मृत्यूची माहिती 'रामायण' मध्ये सीतेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी दिली.

चंद्रकांत पंड्या यांनी रामायण मालिकेत काम करण्याबरोबरच अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना 'कडू मकारनी' या गुजराती चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला होता.

हेही वाचा - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दुबईला गेले होते, नवाब मलिक यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details