मुंबई - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कालच्या भागात एक वादग्रस्त संवाद पाहायला मिळाला. यामधील चंपक चाचा यांच्या तोंडी असलेला संवादामुळे वाद निर्माण झाला आहे. मुंबईची भाषा हिंदी असल्याचा उल्लेख संवादामध्ये होता. यावर मनसे आक्रमक झाल्यानंतर चंपक चाचाची भूमिका करणारे कलाकार अमित भट्ट यांनी राज ठाकरे आणि मनसे परिवाराला पत्र लिहित जाहीर माफी मागितली आहे.
अमित भट्ट यांनी आपल्या पत्रात लिहिलंय की, ''मला जो डायलॉग लेखकाने लिहून दिला होता, तो मी बोललो. मुबईची भाषा हिंदी नसून मराठीच आहे व त्याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल माफ करावे अशी विनंती अमित याने पत्रात केली आहे.''
या मालिकेचा निर्माता असित मोदी यांनीही एक पोस्ट यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन…’तारक मेहता’ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. लोढा यांनी व्हिडिओत म्हटलंय, '''मित्रांनो एक विशेष गोष्ट. भारताची राजधानी असलेली महाराष्ट्राचे सुंदर शहर मुंबई. इथली स्थानिक आणि अधिकृत भाषा मराठी आहे. कालच्या भागात चंपक चाचाच्या माध्यमातून आम्ही सांगितले होते की इथली भाषा हिंदी आहे. याचा भावार्थ हा होता, की मुंबईने सर्व प्रांताच्या लोकांना आणि त्याच्या भाषांचा सन्मान केला आहे, त्यांना प्रेम दिलंय. तरीही चंपक चाचाच्या या वाक्यामुळे कोणाचे मन दुखावले असेल, तर आम्ही अंत-करणापासून माफी मागतो. तारक मेहता का उल्टा चष्मा प्रत्येक प्रांताचा, भाषेचा आणि समुहांचा सन्मान करतो. या मिळून या देशाला महान बनवूयात. जय हिंद.''
मालिकेचे लेखक निरेन भट्ट यांनी मात्र अद्यापही यावर कोणतेही भाष्य सोशल मीडियावर केलेले नाही. सोनी सब वाहिनीवरुन हा शो प्रसारित होत असतो. मात्र त्यांनीही मौन बाळगणे पसंत केलंय. मालिकेतील प्रसंगात सुविचार लिहिण्याची चर्चा आहे. गोकुळधाम ही सोसायटीतील रहिवासी यावर चर्चा करीत आहेत. सुविचार कोणत्या भाषेत असावा यावर चर्चा सुरू असताना चंपक चाचा म्हणतात, ''आपली सोसायटी मुंबईत आहे आणि इथली भाषा हिंदी आहे. त्यामुळे सुविचार हिंदीत असायला पाहिजे. जर आपली सोसायटी चेन्नईत असती तर आम्ही सुविचार तामिळमध्ये लिहिला असता. जर आपले गोकुळधाम अमेरिका किंवा इंग्लंडमध्ये असते तर आपण सुविचार इंग्लिशमध्ये लिहिला असता.'' या संवादानंतर सीनमधील सर्व पात्रे होकार देतात.
दरम्यान, तारका मेहतामधील हा प्रसंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना खटकला आहे. चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय,