मुंबई -कल्पेश भांडारकर हे हिंदी सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश भांडारकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे. आपले थोरले बंधू मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी स्वत:ची पहिली ‘चाबूक’ नावाची मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत. ‘चाबूक’ चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे, सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.
Chabuk Movie Release : मधुर भांडारकरचा भाऊ कल्पेशचे चाबूकद्वारे पदार्पण - स्मिता शेवाळे
थोरले बंधू श्री.मधुर भांडारकर यांच्यासह कल्पेश यांनी स्वत:ची पहिली ‘चाबूक’ नावाची मराठी चित्रकृती घेऊन येत आहेत. ‘चाबुक’ चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे, सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत.
बेला शेंडेने दिला आवाज
जीवन म्हणजे नात्या-गोत्यांची घट्ट वीण. वेगवेगळ्या नात्यांच्या प्रेमळ बंधांनी आपण ती विणत असतो. मध्येच विसंवादाची गाठ बसली, तर नात्यांचे बंध ताणले जातात आणि धागा तुटतो. कधी कधी भान राखून वेळीच नात्यांचा तोल सावरलाही जातो; पण खरा गोंधळ उडतो मनं सांभाळताना. हीच कथा प़डद्यावर सांगणारा ‘चाबूक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘चाबुक’ चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. चित्रपटातील सुमधुर गीतांना बेला शेंडे, ब्रिजेश शांडिल्य, विपिन पटवा यांचा स्वरसाज लाभला आहे.
हेही वाचा -Third front : राऊत म्हणतात आमच्या शिवाय शक्य नाही, काॅंग्रेसने अहंकार बाजुला ठेवावा जाणकारांचे मत