महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

#SaveAarey ः आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार - इरफान खान

विविध संस्था, संघटनांकडून नागरिकांच्या 'आरे वाचवा' चळवळीला पाठिंबा मिळत आहे. त्यातच अभिनेत्री श्रद्धा कपूर, रॅपर डीवाईन, काम भारी, रणवीर कपूर, इरफान खान, अशा अनेक सेलेब्रिटीनी आरेसाठी पुढाकार घेतला आहे.

आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार, '#सेवआरे' मोहिमेला पाठिंबा

By

Published : Sep 5, 2019, 12:12 PM IST

Updated : Sep 5, 2019, 3:36 PM IST

मुंबई - मेट्रो - ३ प्रकल्पासाठी कारडेपो उभारण्याकरता आरे वसाहतीतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं मान्यता दिल्यानंतर या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. राजकारणी व सेलेब्रिटी यांनीही 'आरे' वाचवा मोहिमेला पाठिंबा दर्शवून 'बळ' दिलं आहे. निसर्गानं पदरात टाकलेलं हरितदान उद्ध्वस्त करणारा विकास कोणासाठी आणि मुंबईच फुप्फुस नष्ट करून काय मिळेल, सरकारला असा सवाल सामान्यांपासून तर कलाविश्वातील कलाकार करत आहेत.

विविध संस्था, संघटनांकडून नागरिकांच्या 'आरे वाचवा' चळवळीला पाठिंबा मिळत आहे. त्यातच अभेनेत्री श्रद्धा कपूर, रॅपर डीवाईन, काम भारी, रणवीर कपूर, इरफान खान, अशा अनेक सेलेब्रिटीनी आरेसाठी पुढाकार घेतला आहे. तसेच अमित ठाकरे, संजय निरुपम यांसारख्या नेत्यांनी माध्यमावर 'सेव आरे' या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. तसेच हजारो लोकं या #सेवआरे मोहिमेत आरे जंगलाला वाचवण्यासाठी माध्यमावर जोडली आहेत.

आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार, '#सेवआरे' मोहिमेला पाठिंबा

२९ ऑक्टोबरला वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो ३ च्या कार शेडसाठी आरेच्या जंगलातील २,३२८ झाडे तोडण्यास परवानगी दिली. या विरोधात आंदोलन उभे राहत आहे. रविवारी भर पावसात विविध पर्यावरणवादी संस्थांनी मानवी साखळीच्या माध्यमातून सुमारे अडीच तास जोरदार निदर्शने केली. परंतु, सरकार दाद देत नाही त्यामुळे आता समाज माध्यावर देखील गाण्याचा माध्यमातून, नारे तसेच हॅश टॅग वापरून हजारोंच्या संख्येने 'सेव आरे'साठी मोहीम उभी राहत आहे.

आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेलब्रिटींचा पुढाकार

तसेच आता एका मोहीम मधील पर्यावरण प्रेमीनी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’, असा देखावा साकारत 'सेव आरे' असा संदेश दिला आहे.

पर्यावरण प्रेमीनी घरगुती गणपतीच्या देखाव्यातून ‘आरे वाचवा, जंगल वाचवा’, असा देखावा साकारला आहे.

आरेचे जंगल हा मुंबईचा एकमेव असा हरित पट्टा वाचला पाहिजे. येथील निसर्ग वाचला पाहिजे. तिथे वास्तव्याला असलेले वन्यजीवन तिथले आदिवासी बांधव यांचे घर राहिले पाहिजे, असा संदेश डेट सर्व सामान्य लोक ते राजकीय मंडळी ते सेलेब्रिटी आरे वाचवण्यासाठी सरसावले आहेत.

Last Updated : Sep 5, 2019, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details