स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. मालिकेतील पात्रे लोकप्रिय झालं असून कानेटकर आणि वर्तक कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग झालंय. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर अपूर्वाची भूमिका साकारत आहे आणि शशांकच्या भूमिकेत आहे चेतन वडनेरे. मॉडर्न विचारांची आणि प्रचंड उत्साही, अतिशय लाडावलेली अशी अपूर्वा ही मुलगी आहे. आता मालिकेत लग्नाची धामधूम सुरु होणार असून अपूर्वा-शशांकच्या हळदीसाठी खास पाहुणे पोहोचणार आहे.
जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.