सर्वांनी घरी राहून आंबेडकर जयंती साजरी करा, मराठी कलाकारांकडून आवाहन - आंबेडकर जयंती
बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच राहून साजरी करा बाहेर पडू नका असे आव्हान मराठी कलाकारांनी केले आहे.कलाकारांनकडून नागरिकांना भावनिक आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई -सालाबादप्रमाणे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण सर्व ठिकाणी कोरोना रोगाने थैमान घातले असून कित्येक लोकांना या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात भिमजयंती साजरी केली जाते. मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमून बाबासाहेबांना अभिवादन करतात. मात्र कोरोनामुळे यावर्षी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपआपल्या घरीच राहून साजरी करा, असे आवाहन मराठी कलाकारांकडून केले जात आहे.