महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बुलबुल' फेम अभिनेता अविनाशने आपल्या मृत्यूच्या खोडसाळ बातमीचा केला खुलासा

बुलबुल या नेटफ्लिक्सवरील चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अविनाश तिवारीच्या मृत्यूची बातमी एका मनोरंजन पोर्टलने दिली होती. अविनाशने सोशल मीडियावरुन खुलासा करीत या खोडसाळ बातमीचे खंडन केले आहे. किमान दर्जा सुधारण्याचा सल्लाही त्याने या पोर्टलला दिला आहे.

Avinash Tiwary
अविनाश तिवारी

By

Published : Jul 18, 2020, 8:09 PM IST

मुंबई - अलीकडेच नेटफ्लिक्स चित्रपट ‘बुलबुल’ मध्ये दिसलेला अभिनेता अविनाश तिवारीने शनिवारी त्याच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली आहे आणि अशी बातमी पसरल्यामुळे मीडियावर वैतागला आहे.

एका मनोरंजन पोर्टलने अविनाशच्या निधनाबद्दल बातमी प्रसिद्ध केली होती. अविनाशने सोशल मीडियावरुन या बातमीचे खंडन केले असून बेजबाबदार वृत्ताबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.

"इतक्या लवकर नाही मित्रांनो...हे लोक कोण आहेत...ते कोठून आले आहे...भावांनो कृपया तुमचा थोडा दर्जा सुधारा...प्लिज. धन्यवाद," असे अविनाशने ट्विटरवर लिहिले आहे.

त्याच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना अभिनेत्री मानवी गग्रू हिने लिहिलय, थँक गॉड अवी@avinashtiw85 #FakeNews."

या घोटाळ्यामुळे अस्वस्थ झालेल्या अभिनेता आहाना कुम्रानेही ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - सुशांत मृत्यू प्रकरण : ..तर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रनौत

अविनाशने २०१७ मध्ये 'तू है मेरा संडे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये तो 'लैला मजनू' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला होता. त्याच्या अभिनयाचे समिक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही कौतुक केले होते.

अविनाशने नेटफ्लिक्स अँथोलॉजी घोस्ट स्टोरीज (2018) मध्ये काम केले होते आणि अलीकडेच 'बुलबुल'मध्ये दिसला होता.

परिणीती चोप्रासमवेत 'द गर्ल ऑन द ट्रेन'चे हिंदी रूपांतर हा अविनाशचा आगामी चित्रपट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details