शिमला - कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन झालेला आहे. अशावेळी लोकांच्यावर भूकेने व्याकुळ होण्याची स्थिती ओढावली आहे. माणूस काही तरी धडपड करुन अन्न मिळवू शकतो. अशात त्याच्या मदतीला माणुसकीच्या नात्यातून काही लोक आणि संघटना पुढे आल्या आहेत. मात्र मुक जनावरांची अवस्था वाईट आहे. भटकी कुत्र्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. अशा कुत्र्यांच्या मदतीला आता शिमल्यातील भाऊ बहिण पुढे आले आहेत.
हिमाचल प्रदेशातही लॉकडाऊन आहे. इथल्या कुत्र्यांवरवर उपासमारीची वेळ आली आहे. शिमल्यातील पूजा आणि तिचा भाऊ कर्फ्यूमध्ये जेव्हा शिथीलता दिली जाते त्यावेळेत घराबाहेर पडतात. त्यांच्याकडे कुत्र्यांना खाऊ घलण्यासाठी रोटी आणि बिस्कीट्स असते. शहरातील मॉल, रोड रिज मैदानसह लक्कड़ बाजार परिसरातील भटक्या कुत्र्यांना ते खाऊ देतात.