महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘कॉमेडी धमाका’नंतर ‘टॉकीज मनोरंजन लीग'मध्ये येत्या रविवारी ‘ॲक्शन धमाका’! - 'झी टॉकीज मनोरंजन लीग' सुरु

एप्रिल महिन्यात झी टॉकीजवर मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी होत आहे कारण झी टॉकीज वाहिनीवर 'झी टॉकीज मनोरंजन लीग' सुरु आहे. दिवसभरात मराठीतील गाजलेले ५ चित्रपट दाखवले जाणार आहेत.

‘टॉकीज मनोरंजन लीग'

By

Published : Apr 17, 2021, 1:05 PM IST

महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु आहे व लोकं घरीच बसून आहेत अथवा बसणे अपेक्षित आहे. अशावेळी छोट्या पडद्यावरील मनोरंजन महत्वाचे ठरते. झी टॉकीज वाहिनी नेहमीच नवनवीन प्रयोग करीत असते जेणेकरून प्रेक्षकांचे जास्तीत जास्त मनोरंजन करू शकेल. सदाबहार चित्रपट, खास कार्यक्रम सादर करून या वाहिनीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे आणि यापुढेही करत राहील. एप्रिल महिन्यात झी टॉकीजवर मनोरंजनाच्या चौकार षटकारांची आतिषबाजी होत आहे कारण झी टॉकीज वाहिनीवर 'झी टॉकीज मनोरंजन लीग' सुरु आहे.

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी झी टॉकीज नेहमीच आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तत्पर असते. या लीगमध्ये एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी संपूर्ण दिवस ब्लॉकबस्टर चित्रपट प्रसारित केले जाणार आहेत. यात भक्तिपर आणि कॉमेडी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांनी अनुभवली. येत्या रविवारी टॉकीज मनोरंजन लीग मध्ये ॲक्शन चित्रपटांचा धमाका होणार आहे. एका पेक्षा एक खचाखच ॲक्शनने भरलेले चित्रपट येत्या रविवारी प्रेक्षकांसाठी सादर होणार आहे.

सकाळी ९ वाजता प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी या सुपरहिट जोडीचा 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. दुपारी १२ वाजता ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुळशी पॅटर्न', दुपारी ३ वाजता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सदाबहार चित्रपट 'धडाकेबाज' आणि संध्याकाळी ६ वाजता 'माझा छकुला' हा धमाकेदार चित्रपट सादर होईल. रात्री ९ वाजता रितेश देशमुख याच्या 'लय भारी' या चित्रपटाने टॉकीज मनोरंजन लीग मधील ॲक्शन चित्रपटाच्या मॅरेथॉनचा शेवट होईल.

'टॉकीज मनोरंजन लीग' मध्ये रविवार १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धमाकेदार ॲक्शन-पॅक्ड चित्रपटांचा खजाना सादर होणार आहे झी टॉकीजवर.

हेही वाचा - बचेंगे तो और लढेंगे! 'आरोग्य हेच धनसंपदा' हे विसरू नका - महेश भागवत

ABOUT THE AUTHOR

...view details