मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री काजोलच्या आगामी 'देवी' या शॉर्ट फिल्मचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ९ महिलांच्या संघर्षाचा विषय असून त्यांना एकाच छताखाली राहाणे भाग पडते. ९ वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांची आव्हाने यात दिसणार आहेत.
महिला केंद्रीत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियंका बॅनर्जीने केलंय. यात काजोल शिवाय नेहा धुपिया, नीना कुलकर्णी, श्रृती हासन, शिवानी रघुवंशी, संध्या म्हात्रे, रमा जोशी, मुक्ता बर्वे, रश्विवनी दयामा यासारख्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत.
यापूर्वीही याबद्दल काजोलने भाष्य केले होते. ती म्हणाली होती, ''मी साकारत असलेली ज्योती ही व्यक्तीरेखा माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. परंतु आम्ही खूप बदल शेअर करीत असतो. आजच्या काळात जेव्हा महिलांसोबत भेदभाव, हिंसा यावर बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. त्याकाळात 'देवी'सारखी फिल्म खूप प्रासंगिक आहे. यात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप आनंदित आहे.''
अजय देवगणनेही फिल्मचे पोस्टर शेअर करीत महिला सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले होते.
'देवी' ही शॉर्ट फिल्म २ मार्चला रिलीज होणार आहे.