मुंबई - लोकप्रिय वेब सिरीज 'मिर्झापुर'चा दुसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर या सिरीजच्या विरोधात आवाज उठवायला सुरूवत केली आहे. काहीजण या सिरीजवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत आहेत.
काही दिवसापूर्वी 'मिर्झापुर-२' चा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर ट्विटरवर #बॉयकॉटमिर्झापुर-2 ट्रेंड होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना या सिरीजमधील अभिनेता दिव्येंदु याने या शोमधील कलाकार, टीम आणि याच्या चाहत्यांनी असा ट्रेंडबद्दल विचार करु नये, असे म्हटले आहे.