मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अनेक नवनविण चित्रपट तयार होत आहेत. बरेचसे चित्रपट तयार होत असल्याने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळते. पुढच्या वर्षी रिलीज होणाऱया चित्रपटांमध्येही आत्तापासूनच शर्यत पाहायला मिळते. यामध्ये दीपिका पदुकोणचा 'छपाक' आणि अजय देवगणचा 'तानाजी-द अनसंग वारियर' या चित्रपटांचा समावेश आहे.
बॉक्स ऑफिसवर 'छपाक' सोबत भिडणार 'तानाजी', एकाच दिवशी होणार प्रदर्शित - saif ali khan
अलिकडेच अजय देवगणने त्याच्या 'तानाजी-द अनसंग वारियर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. पुढच्या वर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
अलिकडेच अजय देवगणने त्याच्या 'तानाजी-द अनसंग वारियर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. पुढच्या वर्षी १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर दीपिकाचा 'छपाक' हा चित्रपटदेखील त्याच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्हीही चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे या दोन्ही चित्रपटामध्ये बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळेल.
'तानाजी' चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी मालसुरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटामध्ये सैफ अली खानदेखील महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.
दीपिकाच्या 'छपाक' चित्रपटाविषयीदेखील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दीपिकाची लोकप्रियता पाहता या चित्रपटालाही चांगला प्रेक्षकवर्ग मिळेल, असे समीक्षकांचे मत आहे. त्यामुळे अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांच्या या दोन्हीही चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट बाजी मारेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.