मुंबई -सलमान खानचे बरेचसे चित्रपट 'ईद'च्या मुहूर्तावर प्रदर्शित केले जातात. त्याचा 'भारत' चित्रपटदेखील नुकताच 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सलमान खानच्या 'इंशाल्ला' चित्रपटाच्या प्रदर्शनाचीदेखील तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपटदेखील पुढच्या वर्षी 'ईद'च्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता अक्षय कुमार आणि सलमान खानच्या चित्रपटांची पुढच्या वर्षी 'ईद'च्या दिवशी टक्कर होताना दिसणार आहे. कारण, अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपटदेखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.
पुढच्या वर्षीच्या 'ईद'ला होणार खिलाडी-भाईजानच्या चित्रपटांची टक्कर, एकाच दिवशी होणार प्रदर्शित
सलमान खान हा संजय लीला भन्साळीसोबत तब्बल २० वर्षानंतर काम करणार आहे. 'हम दिल दे चुके सनम'नंतर आता 'इंशाल्ला' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत. तर, या चित्रपटात आलिया भट्ट ही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. सध्या या चित्रपटाचे बँकॉक येथे शूटिंगही सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. या चित्रपटात अक्षय कुमार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, कॅटरिना कैफ हिदेखील त्याच्यासोबत दिसणार आहे.
सलमान खान हा संजय लीला भन्साळीसोबत तब्बल २० वर्षानंतर काम करणार आहे. 'हम दिल दे चुके सनम'नंतर आता 'इंशाल्ला' या चित्रपटासाठी दोघे एकत्र आले आहेत. तर, या चित्रपटात आलिया भट्ट ही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोन्हीही चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी एकाच दिवशी जर हे दोन्हीही चित्रपट सिमेमागृहात धडकले, तर प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद या चित्रपटांना मिळेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.