मुंबई - देशाची राजधानी मोठ्या हिंसेच्या आगीत होरपळत आहे. यामुळे संपूर्ण देशामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी यावर आपली मते व्यक्त केली आहेत.
'गँग ऑफ वासेपूर'चा दिग्दर्शक अनुराग कश्यपने ट्विट करीत म्हटलंय, ''हे स्पष्ट झालंय की प्रो सीएएचा अर्ध मुस्लिमांना विरोध आहे आणखी काही नाही.''
नामवंत गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्त म्हणतात, ''दिल्लीत हिंसा वाढत आहे. सर्व कपिल मिश्रा वेडे झाले आहेत. हे सर्व सीएए विरोधील आंदोलनामुळे घडतंय असे दिल्लीकरांच्या मनात भरवायचे चालले आहे आणि दिल्ली पोलीस काही दिवसात शेवटचा मार्ग वापरतील.''
टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा हिने म्हटलंय, ''प्लिज यांना प्रो सीएए म्हणणे बंद करा. यांना मुस्लिम विरोधीच म्हणा. यांना जे हक्क आहेत ते मुस्लिमांना मिळतील या द्वेषाशी यांचा संबंध आहे, यांचा सीएएशी काही संबंध नाही''
गायक आणि संगीतकार विशाल दादलानी यांनी लिहिलंय, ''सीएए विरोधी लोक २ महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. तेव्हापर्यंत हिंसा झाली नाही जोपर्यंत हे प्रो सीएएवाले आले नाहीत... जरा विचार करा.''
डान्स, गायिका आणि टीव्ही अभिनेत्री गौहर खानने म्हटलंय, ''हा द्वेष कुठुन आलाय? डोक्यावर टोपी घालणारा माणूस, दाढीवाला माणूस, त्याचे एकतर रक्त वाहिले जाते किंवा दहशतवादी ठरवला जातो. पण मी विचारते, की हे काठ्या घेऊन उभे असलेले लोक कोण आहेत, जे निर्दोष लोकांवर दहशत पसरवत रक्तबंबाळ करत आहेत.''
स्वरा भास्करने दिल्लीची दंगल रोखण्यासाठी आवाहन केले आणि लिहिले, ''हे अत्यावश्यक आवाहान आहे, #आम आदमी पार्टी #आम आदमी पार्टी ट्वीटपेक्षा जास्त काही तरी करा.''
अभिनेत्री रिचा चढ्ढाने लिहिलंय, ''शोकसागरात बुडालेल्यांना भरपाई द्या. बंदुकीच्यासमोर उभ्या ठाकलेल्या पोलीसाला सलाम, त्या लाल शर्टवाल्या दहशतवाद्याला अटक करा.''
ईशा गुप्ताने दिल्लीची तुलना सिरीयाशी करीत लिहिले आहे, ''सिरीया? दिल्ली?. माझं शहर, घर असुरक्षीत करण्यासाठीच,फक्त हिंसक लोकच कोणताही विचार न करता हिंसा करतात.''