मुंबई - बॉलिवूडच्या अनेक सेलेब्रिटींनी 'वर्ल्ड थॅलेसीमिया डे'च्या निमित्ताने उलटे होऊन थेलेसीमिया थांबवा, अशी मोहीम सुरू केली आहे. अभिषेक बच्चन, ह्रतिक रोशन आणि फराह खान यांनी मोहिमेत सहभागी होत आपला उलटा फोटो शेअर करुन थॅलेसीमिया योध्यांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्युनियर बच्चनने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''आज ८ मे, वर्ल्ड थॅलेसीमिया डे. मी थॅलेसीमियाच्या योध्यांबद्दल जागरुकता करण्याचे आव्हान स्वीकारतो. हे योद्धे ब्लड डिसॉर्डरशी झुंज देत आहेत. त्यांना जर प्रोफेशनल मेडीकल हेल्प मिळाली नाही तर त्यांच्या आयुष्याची वर्षे कमी होऊ शकतात. त्यांच्या शरीराच्या विकासावर परिणाम होऊ शकतो आणि हाडे कमजोर होतात.''