मुंबई - श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा वाढून २९० वर पोहेचला आहे. तर, ५०० जण जखमी झाले आहेत. ईस्टर संडे साजरा करत असताना हा स्फोट घडला. बॉलिवूडमधुनही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बॉलिवूडकरांनी व्यक्त केला शोक, सोशल मीडियावर वाहिली आदरांजली - siddharth malhotra
श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा वाढून २९० वर पोहेचला आहे.
![श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटामुळे बॉलिवूडकरांनी व्यक्त केला शोक, सोशल मीडियावर वाहिली आदरांजली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3071638-thumbnail-3x2-shrilanka.jpg)
बॉलिवूडमधील सिद्धार्थ मल्होत्रा, अनुष्का शर्मा, हुमा कुरेशी, विवेक ओेबेरॉय, अर्जुन कपुर, मधुर भांडारकर, परिनीती चोप्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आदरांजली वाहिली आहे.
श्रीलंकेच्या या दु:खात सहभागी असल्याचे ट्विट या कलाकारांनी केले आहे. तसेच ज्यांनी हा स्फोट घडवुन आणला आहे, त्यांच्याबद्दल तिव्र संतापही व्यक्त केला आहे.
कोच्छिकाडे, निगोम्बो या २ ठिकाणची सेंट अँटोनी'ज चर्च, काटुवापिटिया येथील सेंट सेबॅस्टिन्स चर्च आणि बट्टीकलोआ येथील झियोन चर्च येथे हे बॉम्बस्फोट झाले. तसेच, किंग्सबरी, शांग्री-ला आणि सिनॅमॉन ग्रँड या कोलम्बोमधील हॉटेलांमध्येही बॉम्बस्फोट झाले. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास हे स्फोट झाले. जखमींना कोलंबो राष्ट्रीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटांनंतर श्रीलंकेच्या संरक्षण मंत्र्यांनी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती.