महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘अजूनही बरसात आहे' मध्ये भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा खेळ - umesh kamat

'अजूनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे काही फ्लॅशबॅक सिन्सही पाहायला मिळताहेत. त्यात ती दोघं आपल्यापेक्षा १० वर्षं लहान वयाची भूमिका करताना दिसतात. सोनी मराठी वाहिनीवरची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडीसुद्धा प्रेक्षकांना आवडत असून या जोडीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतं आहे.

‘अजूनही बरसात आहे'
‘अजूनही बरसात आहे'

By

Published : Jul 21, 2021, 10:02 AM IST

मुंबई -मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे दोघेही मातब्बर कलाकार मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. दोघांनीही फिल्म इंडस्ट्रीचे अनेक ऊन पावसाळे बघितलेत. थोडक्यात इतक्या वर्षांत अनुभव जरी वाढला असला तरी त्यांच्या वयांमध्येही वृद्धी झाली आहे. बऱ्याचदा कथानकाच्या गरजेनुसार कलाकारांना वयापेक्षा जास्त वा कमी दिसावे लागते. ‘अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत त्यांच्या वर्तमानातील वयानुसार भूमिका सादर करत आहेत. ते दोघे त्यांच्या भूमिकांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची कशी सांगड घालताहेत याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

अजूनही बरसात आहे
'अजूनही बरसात आहे' मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे काही फ्लॅशबॅक सिन्सही पाहायला मिळताहेत. त्यात ती दोघं आपल्यापेक्षा १० वर्षं लहान वयाची भूमिका करताना दिसतात. सोनी मराठी वाहिनीवरची ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडीसुद्धा प्रेक्षकांना आवडत असून या जोडीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळतं आहे. लहान वयाची भूमिका साकारणं आव्हानात्मक नक्कीच आहे. दोन्ही काळ सादर करताना मुक्ता आणि उमेश विशेष प्रयास घेत असून मालिकेची टीमही त्यांच्या मदतीला तत्पर असते.
उमेश आणि मुक्ता

वयापेक्षा कमी भूमिका
‘अजूनही बरसात आहे' मालिकेत उमेशला तरुण दिसण्यासाठी क्लीन शेव करावं लागतं आणि त्यापुढचे काही दिवस तो वर्तमान काळातलं चित्रीकरण करू शकत नाही. मुक्ताचाही शॉर्ट हेअर लूक आणि शर्ट-जीन्स असा पेहराव फ्लॅशबॅक एपिसोड्समध्ये पाहायला मिळतो. या सर्व चित्रीकरणासाठी संपूर्ण टीमचा कस पणाला लागतो आणि उत्तम टीमवर्कमुळेच हे इतक्या छान प्रकारे होऊ शकतं. मुक्ता आणि उमेश म्हणजेच आदिराज आणि मीरा या जोडीला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळतं आहे. 'अजूनही बरसात आहे', ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचा -पीव्हीआर’ तर्फे ‘एफडब्ल्यूआयसीई’च्या ५ लाख नोंदणीकृत सदस्यांसाठी मोफत लसीकरण!

ABOUT THE AUTHOR

...view details