महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठीच्या घरात फर्निचर वापरण्यास मनाई, स्पर्धकांची चिंता वाढली - बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये स्पर्धकांचे तीन गट तयार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या रंगणारे वाद टोकाचे बनत चालले आहेत. बिग बॉस यांनी घोषित केले आहे की “घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही” आणि त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा
बिग बॉस मराठी सिझन तिसरा

By

Published : Oct 7, 2021, 3:51 PM IST

Updated : Oct 8, 2021, 4:45 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य दिले. या अंतर्गत दिलेले “माझे मडके भरी” हे पहिले उपकार्य अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आले आणि बिग बॉस यांनी सदस्यांना ताकीद देखील दिली की अशाप्रकारच्या कृत्याचा ते निषेध करतात. त्यानंतर बिग बॉस यांनी घोषित केले आहे “घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही” आणि त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

हा आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या हारे हारे हारे... तर गायत्री म्हणाली ‘जे वापरणार बेड त्यावर तृप्ती देसाई म्हणाल्या आमची डायरेक्ट पडणार रेड”. या उलट दुसरीकडे स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र ग्रुप तयार झालेला दिसतो आहे. हा गट म्हणजे घरातला C गृप.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

तृप्ती देसाई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला ग्रुप. तर आज याच गृपमध्ये चर्चा रंगली ज्यामध्ये स्नेहाने सांगितलं की ‘मीरा सांगत होती की पेंटमध्ये पाणी टाकूया. आता तो ऑइल पेंट त्यात पाणी कसं मिक्स होणार आणि तिचं नाही ऐकला तर तिचा तिळपापड होतो. त्यांच्यासोबत देखील तेच झालं तिचं. ती स्वत:चे नियम बनवते हे खरं आहे.”

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

“माझे मडके भरी” टास्कच्या वेळी मीनल म्हणाली, “आता जो टास्क आहे त्यामध्ये देखील दोन ग्रुप्स असणार आहेत.आणि यानंतर कॅप्टन्सी टास्क होणार ज्यामध्ये दोन उमेदवार निवडले जाणार. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण तसंही त्याला डील करायला खूप आवडत. त्याला सांगायच की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टन्सी टास्कसाठी तुम्ही माझं नावं देखील द्या.”

बिग बॉस मराठी सिझन तिसरा

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

हेही वाचा - श्रीनिवास पोकळेचा नवा सिनेमा 'निबंध'

Last Updated : Oct 8, 2021, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details