संतोष चौधरी म्हणजेच सगळ्यांचे लाडके दादूस बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडल्यानंतर त्या घरामध्ये आता उरले आहेत टॉप ८ सदस्य. त्याच्यात रंगलंय एक नवीन नॉमिनेशन कार्य “Knock Out”. त्यात सदस्य ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करू इच्छितात त्या स्पर्धकाच्या नावाचे पुस्तक पटकावायचे आहे. त्यावरून मीरा, उत्कर्ष आणि जय यांची एका खास विषयावरून चर्चा रंगली. जय आणि उत्कर्ष यांनी मीराला सल्ला दिला तर जयने बिग बॉस मराठी या शो विषयी त्याला काय महत्वाचं वाटतं हे उत्कर्ष आणि मीराला सांगितले.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अगदी पहिल्या आठवड्यापासून दोन ग्रुप खूप चर्चेमध्ये राहिले आहेत. त्यामधील सदस्यांनी टास्क गाजवले आणि बिग बॉसचे घर दणाणून सोडले आणि ते ग्रुप म्हणजे A आणि B. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री या ग्रुपमधील सदस्यांमध्ये देखील वादावादी झाली पण टास्क आला की ते एकत्र येतात असे बर्याचदा घडले आणि अजूनही घडत आले आहे. पण, आता मात्र गायत्री आणि मीरामध्ये झालेल्या जोरदार भांडणामुळे त्या दोघींमध्ये फूट पडली आहे. तर दुसरीकडे, विशालशी कुठेतरी विकास आणि मीनल नाराज आहेत. तर, झाल्या प्रकारामुळे सोनाली आणि विशाल एकमेकांशी अजिबात बोलत देखील नाहीत आणि त्यामुळे विशाल घरामध्ये एकटा पडला आहे. त्याचबाबतीत विकास आणि मीनल यांची सोनालीसोबत चर्चा झाली.