महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठी 3: अक्षय वाघमारेला घराबाहेर पडल्यानंतर आदिश वैद्यने घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री - Adish Vaidya takes wild card entr

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावा लागले तर कालच सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आदिश वैद्य आता बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. घरात शिरण्याआधी आदिश वैद्यने आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले होते ज्यात त्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री असूनही बिग बॉस मराठी सिझन तिसरा जिंकायची इच्छा व्यक्त केली.

बिग बॉस मराठी 3
बिग बॉस मराठी 3

By

Published : Oct 11, 2021, 10:46 PM IST

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल अक्षय वाघमारेला घराबाहेर पडावा लागले तर कालच सिझनची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आदिश वैद्यला एक ‘टेम्प्टेशन’ मिळालं आहे पॉवर कार्ड. या पॉवरद्वारे घरातील कोणता सदस्य कोणते काम करणार याची विभागणी करण्याचा अधिकार आदिशकडे असणार आहे. ज्यामुळे दिवसभरातील कारभारावर आदिशचं वर्चस्व असेल. पण आता हे प्रलोभन स्वीकारल्यास परिणाम स्वरूप या पॉवर कार्डची किंमत घरातील सदस्यांना मोजावी लागणार आहे. आदिशने पॉवर कार्डचा स्वीकार करणार आहे. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील तीन सदस्यांना रात्रभर जागून घराचे पहारेकरी बनावे लागणार आहे. पण त्यावरून स्नेहा वाघ त्याला टोमणे मारताना दिसणार आहे.

बिग बॉस मराठी 3

स्नेहा आदिशला म्हणाली, “आल्या आल्या त्रास दिला तुम्ही सगळ्यांना. आमचे तीन लोकं जखमी केले.” त्यावर आदिश म्हणाला “कुठले तरी तीन होणारच होते. जर तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असत?” स्नेहा म्हणाली “माझी पध्दत वेगळी असती. मी वेगळ्या पध्दतीने डील केलं असंत. म्हणजे माझ्या पध्दतीने मी डील केलं असंत. नॉट नेसेसरी की आपल्या कोणत्या गोष्टीने समोरच्याला त्रास झालाच पाहिजे, त्याचा त्रास कमी करूसुध्दा गोष्टी करू शकतो. आदिश म्हणाला, “त्या दृष्टीने मी पूर्ण प्रयत्न केला आहे”.

बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठी घरात शिरण्याआधी आदिश वैद्यने आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले होते ज्यात त्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री असूनही बिग बॉस मराठी सिझन तिसरा जिंकायची इच्छा व्यक्त केली.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details