मुंबई- बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये, होस्ट सलमान खान तेजस्वी प्रकाशशी गैरवर्तन केल्याबद्दल स्पर्धक करण कुंद्राचा क्लास घेताना दिसणार आहे. सलमानने तेजस्वीला हेही सांगितले की करण तिचा बॉयफ्रेंड असूनही तिची गरज असताना तो कधीही तिच्या पाठीशी उभा राहिला नाही.
बिग बॉस 15 च्या आगामी एपिसोडमध्ये सलमान खान करण कुंद्राला सुनावताना दिसणार आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार, करणने अनेकदा तेजस्वीला शोमधील त्याचा मित्र उमर रियाझची माफी मागायला लावली आहे. वीकेंड का वार एपिसोडमध्ये प्रत्येक स्पर्धकाला आरसा दाखवणाऱ्या होस्टने, उमरने तेजस्वीला पाठिंबा देण्याची तयारी कशी व्यक्त केली हे देखील दाखवले. जेव्हा सलमान म्हणतो: "करणने तुझा बॉयफ्रेंड असूनही तुला कधीही मदत केली नाही," हे ऐकताना तेजस्वी स्वतःला सावरु शकत नाही आणि तिला रडू कोसळते. सलमान करणलाही सांगतो की, "तेजस्वी तुझी प्राथमिकता अजिबात नाही." तेजस्वीशी केलेल्या वागणुकीबद्दल कुंद्राची निंदा करत सलमान खान त्याला म्हणतो की, "भूमिका घे आणि एका माणसासारखे वाग."