मुंबई (महाराष्ट्र): बिग बॉस 15 च्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. घरामध्ये वाद घालणाऱ्या करण कुंद्रा, राजीव अदातिया, उमर रियाझ आणि इतरांना घरातील महिलांचा आदर करत नसल्याबद्दल सलमानने भरपूर झापले.
सलमानने पुरुष स्पर्धकांना फटकारले कारण ते नातेसंबंधांमधील परस्पर विश्वास तोडताना आणि त्यांचे जवळचे संबंध बाजूला ठेवताना दिसतात.
बिग बॉस 15 च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा विशाल कोटियनची चर्चा करताना एकमेकांशी भांडताना दिसले. तेजस्वीला राजीव अडातिया आणि करण यांनी दोष दिला की, जर तिला विशालच्या खेळातील नियोजनाची माहिती होती, तर तिने त्याबद्दल कधीच खुलासा का केला नाही?