मुंबई (महाराष्ट्र): बिग बॉस 15 मध्ये राखी सावंतने ( Rakhi Sawant ) भरपूर राडा घातल्याचे प्रोमोवरुन दिसत आहे. अभिजीत बिचुकलेने (Abhijit Bichukale ) तिला डिवचले होते. ''राखी तू नवरा हायर (भाड्याने) आणलायस का?'', असे अभिजीत बिचुकला म्हणाला होता. त्यानंतर राखी भडकली आणि आदळाआपट करायला सुरूवात केली.
''तू म्हणालास मी माझा नवरा भाड्याने आणलाय? तू भाड्याचा तट्टू आहेस...'', असे म्हणत राखी पिसाळली आणि बिचुकलेच्या अंगावर धावून गेली.
''हे असं चालणार नाही'', असे बिचुकले म्हणाला. पण चिडलेली राखी हाताला लागेल त्या वस्तु फेकू लागली. स्पर्धकांच्या बॅगा, खुर्च्यांची मोडतोड तिने केली.
''तुझ्या डोक्यातच कसे आले की माझा नवरा भाड्याचा आहे'', असे म्हणत ती बिचुकलेकडे गेली. ''सात फेरे घेतलेत. माझा नवरा भाड्याचा नाहीय...'', म्हणत ती ओरडू लागली.
यावर बिचुकले म्हणाला की, सलमान भाईने असे म्हटले होते, म्हणून मी म्हणालो. त्यावर राखी पुन्हा भडकली आणि म्हणाली की, "सलमान भाईने असे कधीच म्हटले नव्हते की माझी पती भाड्याचा आहे. तुझी बायको भाड्याची आहे", असे म्हणत राखी पुन्हा बिचुकलेवर चाल करुन गेली आणि चक्क त्याचे केस पकडले.
राखी आणि अभिजीत बिचुकले यांच्यात सुरू असलेल्या या वादात इतर सदस्य केवळ प्रेक्षक म्हणून पाहात राहिले.
आगामी एपिसोडमध्ये एक टास्क देखील आहे ज्यामुळे नॉन-व्हीआयपी स्पर्धकांना फिनालेचे तिकीट मिळेल. हे टास्क, नेहमीप्रमाणे, घरातील सहकाऱ्यांना अडचणीत आणेल आणि व्हीआयपी आणि नॉन-व्हीआयपी यांच्यात वादविवाद हतील कारण स्पर्धक एकमेकांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आव्हान देतील.
हेही वाचा - Vicky Katrina Wedding : विकी कॅटरिनाच्या विवाहाच्या फुटेजसाठी Ott प्लॅटफॉर्मद्वारे 100 कोटींची ऑफर? 'निक्यंका'चाही मोडणार विक्रम?