मुंबई - बिग बॉस 13 चा पहिला उपविजेता असीम रियाजचा भाऊ उमर रियाज लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शोच्या 15 व्या सीझनमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या उमरने त्याच्या ट्विटर हँडलवर बिग बॉसच्या घरात सामील झाल्याची बातमी शेअर केली आहे. उमरने बिग बॉस 13 फॅमिली स्पेशल एपिसोडमध्ये विशेष उपस्थिती लावली होती. उमर व्यतिरिक्त, निर्मात्यांनी बिग बॉस 15 स्पर्धक म्हणून बिग बॉस ओटीटी फायनलिस्ट शमिता शेट्टी, निशांत भट आणि प्रतीक सहजपाल यांची नावे निश्चित केली आहेत.
अनेकांनी केले उमर रियाजचे अभिनंदन
"मित्रांनो मी बिग बॉस 15 चा स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार आहे याची खात्री झाली आहे. तुम्ही वेळोवेळी मला पाठिंबा दिलात त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आशा आहे की या प्रवासात तुम्ही मला साथ द्याल." असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे. असीमसह अनेक सोशल मीडिया युजर्सनी उमरला शुभेच्छा दिल्या आहेत.