मुंबई- बिग बॉस 14 मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेल्या कविता कौशिकला वाटते की यावेळचे स्पर्धक गेल्या वर्षीच्या लोकप्रिय स्पर्धकांची कॉपी करीत आहेत. आपण घरात आल्यामुळे आता यात चुरस पाहायला मिळणार आहे. यासाठी ती योजना आखत असून रियलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षक तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू पाहतील याबद्दल तिने भाष्य केलंय.
कविता म्हणाली, "मला वाटते की मी एक मजेदार व्यक्ती आहे. मला विनोद करायला, लोकांना त्रास द्यायला आवडते. हा माझा सामान्य स्वभाव आहे. कधीकधी लोकांना याचा राग येतो. वास्तविक, मी एका छोट्या शहरातील आहे आणि लोकांनी मला खूप त्रास दिला आहे, म्हणूनच मी हे शिकली आहे, पण माझी विनोदबुद्धी चांगली आहे. मला आशा आहे की माझे मिश्किल वागणे येथे कामात येईल."