मुंबई- अभिनेत्री-राजकारणी सोनाली फोगट ही बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी नवीन सेलेब्रिटी आहे. तिने भरपूर मनोरंजन करण्याचे आणि वादग्रस्त शोची स्पर्धक म्हणून सकारात्मकता आणण्याचे वचन दिले आहे. शोच्या १४ व्या सीझनमध्ये प्रवेश करतांना ती म्हणाली, "मी बर्याच काळापासून 'बिग बॉस'ची प्रचंड फॅन आहे. शोच्या लोकप्रियतेचे प्रमाण प्रचंड आहे. हा शो नियमितपणे पाहणारे असंख्य लोक मला महिती आहेत. इतक्या चांगल्या संधीला मी कशी सोडून देऊ?"
ती पुढे म्हणाले, "मी या सिझनमधील जवळपास सर्व भाग पाहिले आहेत. आता मी स्पर्धक आहे, त्यामुळे हे अवास्तव वाटत आहे. त्याच वेळी मी उत्साही आणि चिंताग्रस्त आहे. माझा प्रवास कसा असेल हे मला माहित नाही, परंतु मी प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाचे आणि सकारात्मकतेचे वचन देते. "