बिग बॉस मराठी सिझन २' मोठया थाटात सुरू झालाय. स्पर्धक कोण असतील ? घरं कसे असेल ? या बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती..आणि काल संध्या ७ वाजता यासगळ्यावरून पडदा उघडला ...सगळ्यात आधी महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री झाली. याचसोबत लहानग्या हर्षद नायबळ याने पुन्हा एकदा सगळ्याची मने जिंकली...किशोरी शहाणे, शिवानी सुर्वे, सगळ्यांची लाडकी राधा म्हणजेच विणा जगताप, सुरेखा पुणेकर, वैशाली म्हाडे यांचे एका पेक्षा एक परफॉर्मन्स सादर झाले...
किशोरी शहाणे यांची 'बिग बॉस मराठी सिझन २' च्या घरात पहिली एन्ट्री झाली. त्यानंतर एक एककरून १४ सदस्य बिग बॉसच्या घरात गेले...बिग बॉस मराठीचे अलिशान घरं बघून सगळेच अवाक झाले.