मुंबई- महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बिग बॉस मराठी या लोकप्रिय शोचा आज महाअंतिम सोहळा पार पडला. या बहुचर्चित शोचा विजेता कोण ठरणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाचा आता विजेत्याचं नाव जाहीर झालं आहे. एकूण सहा स्पर्धक महाअंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धकांना टक्कर देत शिव ठाकरे विजेता ठरला आहे. विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी आणि २५ लाख रुपये मिळाले आहे.
बिग बॉस मराठी-२ महाअंतिम सोहळा: दिग्गजांवर मात करत शिव ठरला विजेता - big boss marathi 2
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे.५ स्पर्धकांना टक्कर देत शिव ठाकरे विजेता ठरला आहे. शीव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे हे सहा स्पर्धक महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.
शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे हे सहा स्पर्धक महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचले होते. महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा जणांमध्ये चांगलीच चुरस होती. मात्र, या सर्वांना टक्कर देत शिवने बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे.
शिव ठाकरे हा अमरावतीचा आहे. एमटीव्हीच्या रोडीजमध्ये झळकला होता. बिग बॉसच्या घरात त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. या शोचा पहिला कॅप्टन होण्याचा मान त्याने मिळवला होता. वीणा जगताप आणि शिवच्या रिलेशनशिपविषयीच्या चर्चाही मध्यंतरी रंगल्या होत्या. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जातं.