महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिगबॉस फेम राहुल वैद्यचे होणार दोनाचे चार हात; प्रेयसी दिशा परमारशी करणार लग्न - बिग बॉस फेम राहुल वैद्य

राहुल आणि दिशा १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने हे क्षण शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. प्रेमाचा हा आमच्या आयुष्यातील नवा अध्याय आहे. आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” असं राहुल आणि दिशाने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

rahul weds disha
rahul weds disha

By

Published : Jul 6, 2021, 1:50 PM IST

मुंबई -बिग बॉस मुळे अल्पावधीतच प्रसिध्द झालेला गायक राहुल वैद्य (Rahul vaidya) आणि त्याची प्रेयसी दिशा परमार (Disha parmar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. जुलै महिन्यातच ते दोघेही लग्न करणार असल्याचे समजते. अनेक दिवसांपासून सिनेवर्तुळात याचीच चर्चा आहे. त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.

राहुल आणि दिशा १६ जुलैला लग्न बंधनात अडकणार आहेत. आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने हे क्षण शेअर करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही १६ जुलैला आम्ही लग्नबंधनात अडकत आहोत. प्रेमाचा हा आमच्या आयुष्यातील नवा अध्याय आहे. आम्हाला तुमच्या आशिर्वादांची आणि प्रेमाची गरज आहे.” असं राहुल आणि दिशाने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसचं राहुल आणि दिशाला अगदी साध्या आणि खाजगी स्वरुपात लग्न सोहळा पार पडावा अशी इच्छा आहे.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र ‘बिग बॉस’ च्या १४व्या पर्वात राहुलने दिशा परमारला प्रपोज केलं होतं. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

हेही वाचा -मुलांच्या जीवनात आजीआजोबांचे महत्व वेगळेच - सुप्रिया पिळगावकर

ABOUT THE AUTHOR

...view details