मुंबई- कौन बनेगा करोडपती हा शो १९ ऑगस्टपासून सोनी टीव्हीवर सुरू होतोय. याचा ट्रेलर अलिकडेच लॉन्च करण्यात आला. यावेळी एका रहस्याचा उलगडा बिग बी यांनी केला. बच्चन कुटुंबिय या शोपासून लांब का आहेत यावरचा पडदा त्यांनी उघडला.
अमिताभ म्हणाले, "माझ्या परिवारातील सर्वजण कौन बनेगा करोडपती शो पाहतात. जया मात्र नियमित हा शो पाहते. कितीही काम असले तरी शो सुरू झाल्यानंतर ती टीव्ही समोर येऊन बसते. यासाठी सर्वांसमक्ष तिचे आभार मानतो."
बच्चन यांच्या कुटुंबातील मुलगी श्वेता बच्चन-नंदा आणि सुन ऐश्वर्या राय बच्चन यादेखील शो पाहतात. मात्र शो आणि चॅनलच्या काही नियमांमुळे त्या शो पासून लांब आहेत असेही बच्चन पुढे म्हणाले.
बच्चन म्हणाले, "माझ्या कुटुंबियांना घरी केबीसी खेळायला आवडते. कधी श्वेता खेळते तर कधी ऐश्वर्या. आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि प्रश्न उत्तरांवर चर्चा करतो. शोच्या नियमांमुळे ते यात सहभागी होऊ शकत नाहीत. म्हणून मला त्यांना शोपासून दूर ठेवावे लागते."