मुंबई -अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या 'भूत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना ट्रेलरची उत्सुकता होती. आता ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचेल यात शंका नाही.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'हॉन्टेड शिप'चा थरार पाहायला मिळतो. त्या जहाजामध्ये नेमकं काय घडलेलं असतं, याचा शोध घेण्यासाठी निघालेला विकी कौशल कसा भुताच्या जाळ्यात अडकतो, याची भयावह झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.